श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय
श्री शिवाजी शिक्षण संस्था, चातारी, ही प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहे, जी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करते. 1962 साली या संस्थेची स्थापना झाली.

संस्थेचा इतिहास व उद्दीष्टे
- श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी करण्यात आली.
- संस्थेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आहे.
- महाविद्यालयात विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, जे विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्ये प्राप्त करण्यास मदत करतात.
- श्री शिवाजी शिक्षण संस्था, चातारी ही एक नामांकित शैक्षणिक संस्था असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने 1962 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली
महाविद्यालयाच्या वैशिष्ट्ये
अनुभवी शिक्षकवर्ग
विद्यार्थी घडवण्यासाठी समर्पित आणि तज्ज्ञ शिक्षक उपलब्ध
व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र
विविध उद्योगधंद्यांशी निगडीत अभ्यासक्रम
क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम
विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाची संधी
ग्रंथालय व संगणक प्रयोगशाळा
आधुनिक सुविधा आणि शिक्षणसाहित्य
माध्यमांतून यशाची दखल
सुमित केशवे यांचे विविध वृत्तपत्रांतून कौतुक!
श्री शिवाजी विद्यालयाच्या नववी इयत्तेतील विद्यार्थी सुमित गजानन केशवे याने डॉ. होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले, आणि त्याच्या या यशाची दखल राज्यातील विविध दैनिक वृत्तपत्रांतून घेण्यात आली आहे.लोकल, प्रादेशिक व राज्यस्तरीय वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे सुमितच्या यशाची दखल संपूर्ण समाजाने घेतली असून हे सर्व विद्यालयासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.






शिक्षण,म्हणजे भविष्याची हमी
शिक्षण,म्हणजे भविष्याची हमी
शालेय आणि उच्च माध्यमिक शिक्षण
आमच्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था आहे. आम्ही 5वी ते 10वी पर्यंत शालेय शिक्षण तसेच उच्च माध्यमिक शिक्षण (12वी – कला शाखा) आणि MCVC (व्यावसायिक अभ्यासक्रम) प्रदान करतो.

MCVC
MCVC म्हणजे Minimum Competency Vocational Courses, ज्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करता येतात आणि करिअरच्या दृष्टीने विविध संधी उपलब्ध होतात.
मूलभूत मूल्ये
आम्ही शिस्तबद्ध जीवनशैली, प्रामाणिकता, संघभावना आणि परस्पर सन्मान यांना प्राधान्य देतो. आमचे मूल्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करताना विश्वास, सहकार्य आणि पारदर्शकतेला प्रोत्साहन देतात.
स्वअनुशासन
स्वातंत्र्याची जाणीव आणि व्यक्तिगत व सामाजिक जबाबदारीबाबतची बांधिलकी असलेले शिस्तबद्ध जीवन.
संघभावना आणि सहकार्य
परस्पर विश्वास, जबाबदारीची जाणीव आणि सहकार्याच्या भावनेने कार्य करणे.
प्रामाणिकता आणि सचोटी
प्रत्येक व्यवहारात प्रामाणिकपणा, प्रगल्भता आणि सचोटी कायम राखणे.
स्वत:चा आणि इतरांचा सन्मान
आत्मसन्मान जपणे आणि इतरांविषयी प्रेम, आदर व आपुलकी बाळगणे.